Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्ह्यातील 116 रेशन दुकानदारांचा राजीनामा
    जळगाव

    जिल्ह्यातील 116 रेशन दुकानदारांचा राजीनामा

    SaimatBy SaimatApril 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    जिल्ह्यातील 116 दुकानदारांनी वर्षभराच्या कालावधीत रेशन दुकान चालवण्यास इच्छुक नसल्याने स्वेच्छेने जिल्हा पुरवठा विभागाकडे राजीनामा दिला आहे. रेशन दुकान चालवण्यासाठी कुणी व्यक्ती नसणे, प्रकृती ठीक नसणे, स्वेच्छेने तसेच कंटाळूनही दुकानदारांनी रेशन दुकानाचा राजीनामा दिला असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

    रेशन धान्य वाटप ऑनलाइन होत आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा उमटवल्यानंतर लाभार्थ्यांना धान्य वाटप करणे बंधनकारक आहे. पूर्वीसारखा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करणे शक्य होत नाही. बहुतांश लाभार्थी जागरूक झालेले असल्याने धान्याचा लाभ सोडत नाहीत.त्यामुळे प्रतिक्विंटल दीडशे रुपये मार्जीनवर रेशन दुकानदारांना अवलंबून राहावे लागत आहे. रेशन दुकानदारांनी राजीनामा देण्यामागे ही सुद्धा कारणे आहेत. लाभार्थींना वाटप करण्यात येणाऱ्या धान्याचे रेकॉर्ड अद्ययावत न ठेवल्यास पुरवठा विभागाकडून कारवाई होत आहे. लाभार्थीही तक्रार करतात. त्यामुळे दुकानदारांना तपासणीला सामोरे जावे लागते. इतर व्यवसाय व रेशन दुकानाचा ताळमेळ बसत नसल्याचे सांगण्यात येते आहे.

    ग्रामीणमधील 72 दुकाने
    शहरी भागातील 44 तर ग्रामीण भागातील 72 दुकानदारांनी रेशन दुकानाचा जिल्हा पुरवठा विभागाकडे राजीनामे दिले आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी 15 रेशन दुकानदार पाचोरा व जामनेर तालुक्यातील आहेत. अमळनेर शहरातील 11 रेशन दुकानदारांनी राजीनामे दिले तर चोपडा तालुक्यातील 9 रेशन दुकानदारांनी राजीनामे दिले. राजीनामा देण्यात आलेल्या 116 रेशन दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही दुकाने नव्याने मंजूर करण्यात येणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची जबरदस्त कारवाई

    March 23, 2026

    Erandol : एरंडोल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालक फरार

    March 23, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.