Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आकाशवाणी चौकातील सर्कलवर चढले वाहन
    जळगाव

    आकाशवाणी चौकातील सर्कलवर चढले वाहन

    SaimatBy SaimatApril 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 
    शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक या तिन्ही प्रमुख चौकांमध्ये सर्कलला विरोध होऊन देखील तेथे सर्कल उभारण्यात आले आहे. दरम्यान , या चौकातील सर्कलमुळे अपघातांची शक्यता वर्तविण्यात आली होती. ती सत्यात उतरल्याचे आज सकाळी समोरआले आहे. आकाशवाणी चौकातील सर्कलवर आज पहाटे एक वाहनच चढल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.
    जळगाव शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आलेले आहे. यात गुजराल पेट्रोल पंप चौक आणि प्रभात चौकात उड्डाण पुल घेण्यात आले असून याच्या पुढे आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक या तिन्ही प्रमुख चौकांमध्ये मोठे सर्कल उभारण्यात आले आहे. या सर्कलमुळे वाहतुकीची कोंडी होत असून यामुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यतादेखील असल्याने याला प्रखर विरोध करण्यात आला. तथापि, प्रशासनाने याला न जुमानता सर्कल उभारले असून यामुळे अपघातांना निमंत्रण मिळाले आहे.
    दरम्यान आज पहाटे भरधाव वेगाने जाणार्‍या पिकअप व्हॅनच्या चालकाला अचानक समोर सर्कल असल्याचे न दिसल्याने पिकअप व्हॅन थेट सर्कलच्या कठडे तोडून वर चढल्याचे दिसून आले. यात चालकाला दुखापत झाली आहे. यामध्ये सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी आगामी काळात भीषण अपघाताची शक्यता असल्याने या सर्कलबाबत काही तरी निर्णय घ्यावा. अन्यथा येथे किमान धोक्याची सूचना तरी ठळकपणे लावावी अशी मागणी आता होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची जबरदस्त कारवाई

    March 23, 2026

    Erandol : एरंडोल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालक फरार

    March 23, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.