जळगावात शिवाजी नगरात खून

0
8

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर परिसरातील हुडको येथे आज रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास एका ४० वर्षीय इसमाचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शिवाजीनगर हुडको परिसरातील मोहंमद मुसेफ शेख इसाक ( वय ४०, रा. शिवाजी नगर) यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास चॉपर हल्ला झाला. यात मोहंमद यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे.

सोमवारी मुसेफचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. नमाजसाठी नागरिक जात असताना घटना त्यांच्या लक्षात आली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पथक पोहचले आहे. मयताजवळ चॉपरचे कव्हर, एका शस्त्राची मूठ, रुमाल असे साहित्य पडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here