Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»उच्च शिक्षित इंजिनिअर तरुणीला लाखो रुपयात ऑनलाईन फसवणूक
    क्राईम

    उच्च शिक्षित इंजिनिअर तरुणीला लाखो रुपयात ऑनलाईन फसवणूक

    SaimatBy SaimatMarch 24, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    गेल्या कितीक वर्षांपासून पोलीस विभाग व बॅंकाकडून वेळोवेळी कुणालाही ओटीपी न देण्याचे आवाहन करत असते परंतु काही लोक यामध्ये अडकताच त्याच प्रकार जळगावत हि एक उच्च शिक्षित इंजिनिअर तरुणीला लाखो रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
    मोबाईलवर आलेला ओटीपी कुणालाही शेअर करु नका असे बॅंकाकडून वेळोवेळी आवाहन केले जात असते. भोळेभाबडे लोक या आवाहनाकडे दुर्लक्ष करत फसतात. मात्र अनेक सुशिक्षीत देखील ओटीपी शेअर करुन आपली फसवणूक करण्याची दुस-याला संधी देत असतात. जळगाव शहरातील सॉफ्टवेअर इंजीनिअर तरुणीने देखील पलीकडून मंजुळ आवाजात बोलणा-या मोबाईल धारक तरुणीस ओटीपी सांगून आपली लाखो रुपयात फसवणूक करुन घेतल्याचे उघड झाले आहे.
    शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात राहणारी तरुणी पुणे येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजीनिअर पदावर कामाला आहे. गेल्या दोन महिन्यापासून तिने आयसीआयसीआय बॅंकेचे क्रेडीट कार्ड घेतले आहे. 7 मार्च रोजी सदर तरुणीला तिच्या मोबाईल क्रमांकावर क्रेडीट कार्ड सवलत हवी का अशी पलीकडून बोलणा-या तरुणीने विचारणा केली. क्रेडीट कार्ड सवलत हवी असल्यास पन्नास हजार रुपयांचे बिल पाठवते असे तिला पलीकडून बोलणा-या तरुणीने सांगितले. हळूहळू पलीकडून बोलणा-या तरुणीने गोड बोलून सॉफ्टवेअर इंजीनीअर तरुणीच्या मोबाईलवरील सर्व स्टेप्स माहिती करुन घेतल्या. त्यानंतर मोबाईलवरील ओटीपी विचारुन घेतला. ओटीपी सांगितल्यानंतर तरुणीच्या मोबाईलवर 1 लाख 97 हजार 897 रुपयांचे बिल आले. सदर रक्कम तिच्या बॅंक खात्यातून विविध रकमांच्या स्वरुपात वजा झाल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.