Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दारूडया पतिची डोक्यात कुऱ्हाड घालत पत्नीच्या निघृण हत्या
    क्राईम

    दारूडया पतिची डोक्यात कुऱ्हाड घालत पत्नीच्या निघृण हत्या

    SaimatBy SaimatMarch 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 
    तालुक्यातील मेहूणबारे परिसरात खळबळजनक घटना उघडकीस  आली आहे. पतिने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालत खून केल्याची घटना घडली आहे. निनुबाई कुवरसिंग पावरा असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांनी संशयीत आरोपी  कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, राज्य मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे.
    याबाबत माहीती अशी की, मध्यप्रदेशातील मोहरतमाळ येथील असलेले  पावरा दाम्पत्य गेल्या वर्षांभरापासून मेहूणबारे शिवारात एकाच्या शेतात सालाने काम करतात. शेतातच एका शेडमध्ये ते राहत होते. काल रात्री  कुवरसिंग चत्तरसिंग पावरा यांनी आपल्या पत्नीला तु मद्यपान का केले आहे. असे विचारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्यावर घरात पडलेली कुऱ्हाड डोक्यात घालून पत्नी निनुबाई पावरा हिची निघृणपणे हत्या केली. ही घटना काल रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
    या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच मेहूणबारे पोलिस सपोनि विष्णू आव्हाड, प्रकाश चव्हाण, धर्मराज पाटिल, सुभाष पाटिल, मोहन सोनावने, गोरख चकोर, हनुमंत वाघेरे, योगेश बोडके आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व घटनेबाबत पती कुवरसिंग यांना विचारपूस केली असता. त्यांनीच पत्नीची कुऱ्हाड डोक्यात घालून खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याला मेहूणबारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून ज्ञानेश्वर माळी यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे परिसरात भादवी कलम- ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सपोनि विष्णू आव्हाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    जळगाव: तरुणाचा विषप्राशनातून दुर्दैवी मृत्यू

    February 20, 2026

    Chopda:चोपड्यात घरासमोर गाडी लावण्यावरून हाणामारी

    February 20, 2026

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.