बक्षीपूर येथे धारदार विळा लागल्याने एकाचा मृत्यू

0
30

रावेर : प्रतिनिधी
झाडाची फांदी तोडतांना विळा हाताला लागल्याने गंभीर जखमी होवून ४४ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बक्षीपूर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भगवान लक्ष्मण शिंगोटे (वय-४४) रा. बक्षीपूर ता. रावेर हे घरासमोर असलेल्या झाडावरील फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढले. त्यावेळी झाडीची फांदी विळ्याने तोडत असतांना त्यांच्या हाताला विळा लागला. यात मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने भगवान शिंगोटे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सतीष सानप करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here