यावल उपसा सिंचनच्या 502 कोटीच्या योजनेस तत्वतः मान्यता

0
17

साईमत न्यूज नेटवर्क जळगाव

जिल्ह्यातील शेळगाव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा लाभक्षेत्रातील शेतक-यांना लाभ होण्याच्या दृष्टीने शेळगाव बॅरेजवरील प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेच्या 592.01 कोटी किंमंतीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला व जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. 27 जून 2023 रोजी ‘शासन आपल्या दारी’ झालेल्या कार्यक्रमातील वचनाची मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्ती केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार तापी विकास महामंडळ, जळगाव यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता. तसेच ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सदर प्रकल्प मंजूर होण्यासाठी साकडे घातले होते.
यावल तालुक्यातील बहुतांश क्षेत्र CGWB अहवालानुसार भुजल वापर दृष्ट्या डार्क झोन ( Over Exploited Zone) मध्ये येतो, तसेच शेळगाव बॅरेजच्या जलाशयापासून 16 किलोमीटर दूर व 100 मीटर उंचीवरील यावल तालुक्यातील अधिसूचित क्षेत्राला शेतकरी वैयक्तिकरित्या पाणी उपसा करू शकत नव्हते. शेळगाव बॅरेजवर आतापर्यंत झालेला रु. 900 कोटीचा खर्च झालेला असला, तरी हजारो शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध असून सुद्धा केवळ यावल उपसा सिंचन योजनेस मंजुरी नसल्यामुळे आपले क्षेत्र ओलिताखाली आणता येत नव्हते. मात्र सदर उपसा सिंचन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने बॅरेज मधील बिना वापर असलेल्या पाण्याचा वापर होवून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ होणार आहे.

यावल तालुक्यातील 19 गावांतील 9128 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

जळगाव ग्रामीण मतदार मतदारसंघातील शेळगांव बॅरेज मध्यम प्रकल्प केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजिवनी योजने अंतर्गत समाविष्ट आहे. शेळगांव बॅरेज बांधकाम पूर्ण झाले आतापर्यंत 50% जलसाठा झाला असून चालु वर्षात 100% पाणीसाठा करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा 166.366 द.ल.घ.मी. इतका आहे. यावल तालुक्यातील साकळी, नावरे, विरावली, महेलखेडी, कोरपावली, दहिगा, वाघोदे, चुंचाळे, गिरडगाव, वढोदे, दगडी, बोराळे, शिरसाट, यावल शहर, सांगवी बु. चितोडे, अट्रावल, सातोद, कोळवद या 19 गावातील 9128 हेक्टर कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सदर प्रकल्पामुळे प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला व जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.असल्यामुळे या गावातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकरी हिताच्या 502 कोटीच्या यावल उपसा सिंचन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याचा आनंद : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

502 कोटीच्या यावल उपसा सिंचन योजनेस मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिल्याने प्रकल्पातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर होवून या योजनेद्वारे यावल तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने आपल्याला मनस्वी; आनंद आहे. शेती हा आपल्या समाजाचा कणा असून महायुती शेतकर्‍यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच या प्रकल्पांचा लाभ जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला आणि जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. भविष्यातही याच प्रकारे विविध प्रकल्पांना निधीची कमतरता पडू नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here