0
17

*राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची बैठक बुधवारी ;शरद पवार घेणार मतदारसंघाचा आढावा – नवाब मलिक*

 

 

 

मुंबई – प्रतिनिधी

२०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी झालेले व पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

ही बैठक आदरणीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती मात्र पवारसाहेबांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.

 

या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here