शाहूनगरातील रिक्षाचालकाची महिलेने केली सव्वा लाखांत फसवणूक

0
8

साईमत, जळगाव, प्रतिनिधी

शहरातील शाहूनगरातील रिक्षाचालकाची 1 लाख 20 हजारांत फसवणूक केल्याप्रकरणी चार जणाांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शाहूनगरात काशीनाथ तुकाराम चौधरी (वय63) हे रिक्षाचालक वास्तव्यास आहेत. त्यांची बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील देवकाबाई सचिन इंगळे व पूजा सचिन इंगळे तसेच कुसुंबा (ता.जळगाव) येथील रेखा पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याशी ओळखी आहे. या ओळखीचा फायदा घेत चार जणांनी काशीनाथ चौधरी यांचा मुलगा याचा विवाह पूजा इंगळे हिच्यासोबत करवून देण्याचे ठरविले.

त्यानंतर देवकाबाई सचिन इंगळे या महिलेने तिच्या घरावरील कर्ज फेडण्याकरिता 1 लाख 20 हजार रुपये घेतले. यादरम्यान संबंधितांनी ज्या पूजा सोबत काशिनाथ यांच्या मुलाचे लग्न ठरविले होते. तर पूजा हिला पक्की विवाह नोंदणीसाठी व नांदण्यासाठी सासरी जळगाव येथे पाठवले नाही. तसेच घेतलेले पैसेही परत केले नाही. 27 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यानच्या काळात हा सर्व प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर काशिनाथ चौधरी यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरुन रेखा पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पाटील दोन्ही (रा. कुसुंबा ता. जळगाव), देवकाबाई ऊर्फ कविता सचिन इंगळे व पूजा ऊर्फ पौर्णिमा सचिन इंगळे दोन्ही रा. नांदुरा, ता जळगाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनराज निकुंभ हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here