सावद्यात मदार फाउंडेशनतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात २१ जोडप्यांचे ‘शुभमंगल’

0
8

सावदा, ता.रावेर : वार्ताहर

येथे प्रथमच मदार फाउंडेशनतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात शनिवारी, २५ नोव्हेंबर रोजी मुस्लिम वधू-वरांचे २१ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ झाले. अध्यक्षस्थानी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे होत्या. उद्घाटक म्हणून धुळ्याचे आ.डॉ.फारुक शाह होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ.चंद्रकांत पाटील, डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष हाजी हारूण, शिवसेनेचे अफसर खान, शिवसेना शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी, समाजसेवक सोहेल खान, ज्येष्ठ पत्रकार युसूफ शाह, रफीक सेठ ऐनपूर, धनंजय चौधरी, हाजी अजमल शाह जळगाव, माजीद जकेरिया आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ.चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानिमित्त मदार फाउंडेशनचे पदाधिकारी रहीम शाह, फारुक अली, सलीम शाह, अमजद शाह, रशीद शाह रजा शाह, मेहमूद शाह, शरीफ शाह, युनूस शाह, युसुफ शाह अमीन शाह यांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मदत स्वरूपी एक लाख रुपये दिले. शहाब्रादरीतर्फे पहिल्यांदाच यशस्वीरित्या झालेल्या सामूहिक विवाह कार्यक्रमापासून बोध घेऊन इतरांनीही असे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here