Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»मोटारसायकल चोरट्यांकडून १६ दुचाकी जप्त
    क्राईम

    मोटारसायकल चोरट्यांकडून १६ दुचाकी जप्त

    SaimatBy SaimatAugust 31, 2023Updated:August 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव

     जिल्ह्यासह परजिल्ह्यातून चोरीच्या दुचाकी आणून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून चोरीच्या १६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पोलीस पथकाला दिले होते.

    त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गोपनीय माहितीनुसार सुनील भिल पिंप्रीसिम (ता.एरंडोल)येथील यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत विचारपूस केली असता त्याने इतर चोरीच्या ३ दुचाकी काढून दिल्या.

    त्यानंतर ह्या दुचाकी नांगदुली ता.एरंडोल येथील खुशाल पाटील व गोविंदा कोळी यांच्याकडून विनाकागदपत्राच्या आधारे कमी किमतीत विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने खुशाल पाटील आणि गोविंदा कोळी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अजून ९ मोटारसायकली हस्तगत केल्या. त्यानंतर सुनील भिल याची अजून चौकशी केली असता तपासात पाचोरा तालुक्यातील हर्षल पाटील (राजपूत) यांच्याकडून चोरीच्या ४ दुचाकी हस्तगत केल्या.

    दरम्यान या सर्व दुचाकी संतोष इंगोले रा. अकोला याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून चोरून या चौघांकडे विक्री करण्याचे काम दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना अटक केली. चौघांकउून ७ लाख ६० हजार रुपये किमतीच्या १६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी सुनील श्‍यामराव भिल (वय ३५) रा.पिंप्रीसिम (ता. एरंडोल), खुशाल उर्फ भैय्या राजू पाटील (वय २०), गोविंदा अभिमन्य कोळी (वय ४५) दोन्ही रा.नागदुली ता.एरंडोल आणि हर्षल विनोद कोळी (वय २०) रा. मोहाडी (ता.पाचोरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यांनी लावला तपास
    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चोबे, सहायक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप सावळे, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चौधरी, अनिल चौधरी, प्रीतम पाटील, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, गोरख बागुल, उमेश गोसावी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील, मोतीलाल चौधरी, प्रमोद ठाकूर यांच्यासह इतरांनी कारवाई केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Shendurni : शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण

    March 15, 2026

    Faizpur : फैजपूर शहरात मुक्ताई पालखी सोहळा

    March 15, 2026

    Bhusawal : पाडळसे शिवमहापुराण कथास्थळावर प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.