Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Mumbai crime : विशेष पोलीस मोहिमेत मुंबईत 10 आरोपी अटक; 29 किलो ड्रग्ज आणि 10.14 कोटींची संपत्ती जप्त
    क्राईम

    Mumbai crime : विशेष पोलीस मोहिमेत मुंबईत 10 आरोपी अटक; 29 किलो ड्रग्ज आणि 10.14 कोटींची संपत्ती जप्त

    saimatBy saimatApril 8, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / मुंबई

    अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा मुंबईने शहरात विशेष मोहिम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केली असून तब्बल 10 आरोपी अटकेसाठी घेण्यात आले आहेत. या कारवाईत 29.292 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 10 कोटी 14 लाख 46 हजार 100 रुपये आहे.

    पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या या कारवाईत 902 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), 20.700 किलो गांजा आणि 7.690 किलो हायड्रोपोनिक गांजा असा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. 1 एप्रिल ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत वडाळा, अंधेरी, बांद्रा, मालाड, नागपाडा, घाटकोपर, धारावी, माहिम, गोरेगाव यांसारख्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

    वडाळा बीपीटी रोड परिसरात एमडी विक्री करणाऱ्या आरोपीकडून 218 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली, तर विलेपार्ले परिसरातून 7.690 किलो हायड्रोपोनिक गांजा हस्तगत झाला. वडाळा टीटी परिसरातून 20.700 किलो गांजा, नागपाडा भागातून 117 ग्रॅम एमडी जप्त झाली. गोरेगाव, धारावी, अंधेरी आणि माहिम येथील कारवाईत 281 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले, तर बांद्रा व मालाड परिसरातून अनुक्रमे 163 ग्रॅम आणि 123 ग्रॅम एमडी जप्त झाली आहे.

    या सर्व प्रकरणांमध्ये एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित युनिटकडून सुरू आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या विशेष मोहिमेमुळे मुंबईतील ड्रग्ज नेटवर्कवर मोठा आघात झाला असून शहर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Nashik Crime : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरण; ६ जणांना अटक, ९ गुन्हे दाखल

    April 8, 2026

    Dharangaon : धरणगाव हादरले! विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला बेड्या.

    April 8, 2026

    उन्हाळी सुट्टीत एसटी प्रवास महाग; १० टक्के भाडेवाढ आणि स्वच्छता अधिभार लागू

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.