धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथे कृषी केंद्राचे गोडावून फोडून रोकडसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकुण ५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भूषण संजय पाटील (वय-२९, रा.बांभोरी ता.धरणगाव) यांचे बांभोरी गावात शेतकरी कृषी केंद्र नावाचे दुकान आहे. दुकानाच्या बाजूला असलेल्या त्यांच्या दुकानाचे गोडावून आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील ४ हजार ३०० रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर आणि ७०० रुपयांची रोकड असा एकूण ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यासंदर्भात भुषण पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाहीत दीपक पाटील करत आहे.