साईमत, जळगाव, प्रतिनिधी
तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पैशांसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात रविवारी ४.४५ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडी बुद्रुक येथील मनीषा राठोड यांचा विवाह अकोला येथील नितीन बळीराम राठोड यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर मनीषा हिच्या वडिलांनी लग्नात हुंडा कमी दिला. या कारणावरुन तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घर बांधण्यासाठी १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी मनीषा हिच्याकडे तिचे पतीसह सासरच्यांनी केली. तसेच याच कारणावरुन तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून मनीषा राठोड या माहेरी जळगाव येथे निघून आल्या.
याबाबत त्यांनी रविवारी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यावरुन मनिषा यांचे पती निलेश राठोड, सासू प्रमिलाबाई राठोड दोन्ही रा. अकोला, सचिन बळीराम राठोड रा अमरावती, बबली सुभाष चव्हाण, सुभाष चव्हाण, दोन्ही रा. मुंबई, वसंता जाधव, रा जयरामगढ ता. खामगाव व दामोदर काशीनाथ राठोड रा, पातुर अकोला या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील हे करीत आहेत.
