समाजातील वाईट विचारांविरुद्ध आजची सशक्त स्त्री बनूया ‌- शिवानी पवार

0
12

धुळे : प्रतिनिधी
वाईट विचारांच्या लोकांचा दृष्टिकोन कसा ओळखून घ्यायचा, हे समजावत समाजातील वाईट विचारांविरुद्ध आजची सशक्त स्त्री आपण बनूया असे आवाहन युवासेनेच्या शिवानी पवार यांनी केले. त्या येथील चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यावर प्रशिक्षण शिबीरा दरम्यान मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कोरे कमिटी सदस्य व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्या शितल देवरूखकर-शेठ यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचे संभाव्य लैंगिक शोषाण रोखण्याकरता अथवा बाल विनयभंगाच्या घटनांना पायबंद घालण्याकरता ” चांगला – स्पर्श – वाईट – स्पर्श ” या अतिशय गंभिर समस्येवर समुपदेशनाच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्याची व्यापक मोहिम युवासेना युवतींतर्फे राबवण्यात आली.
सदर मोहिमे अंतर्गत धुळे येथील कमलताई प्राथमिक विद्या मंदिर शाळेत समुपदेशक प्रमुख वक्त्या शिवानी पवार यांच्या सहकार्याने प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. चौथीच्या सुमारे 400 विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श वाईट स्पर्श ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शाळेत शिकवताना षटकोन शिकवले जातात त्रिकोण शिकवले जातात पण दृष्टिकोन शिकवले जात नाही.
वाईट विचारांची लोकांचा दृष्टिकोन कसा ओळखून घ्यायचा, समाजातील वाईट विचारांविरुद्ध आजची सशक्त स्त्री आपण बनूया हें आव्हान करून चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यावर प्रशिक्षण मुलांना यावेळी देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व कार्यक्रमाचे आयोजन युवासेना युवती जिल्हाप्रमुख सोनी सोनार, मुख्याध्यापिका कल्पना पुनमचंद मोरे, प्रियांका जोशी, शहरप्रमुख दक्षता पाटील, नेहा वाघ, शिक्षिका सौ.सुनीता चव्हाण, सौ.मंजुषा भावसार, रूचिता बागुल, रूपाली बारी, युवती उपशहरप्रमुख पूजा चव्हाण, गायत्री सदणौर, चेतना आहिराव व समस्त युवती युवासेना अधिकारी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here