संजय राऊतांचे गोवा निकालांबाबत मोठे वक्तव्य…

0
37

मुंबई : गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमधील मतमोजणीचे निकाल आज जाहीर होत आहेत. पहिल्या फेरीच्या निकालात गोवा आणि उत्तरप्रदेशातही शिवसेनेची पीछेहाट होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मतमोजणीविषयी भूमिका मांडली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीबाबत  शिवसेनेच्या एंट्रीमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांच्या गोव्यातील प्रचारानंतर त्यांनी गोव्यात शिवसेनेचे खाते उघडण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

ही बातमी पण वाचा : उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा जादूचा आकडा पार

मी मतमोजणी पाहत आहे. पोस्टल बॅलेटवर जाऊ नका. दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. पंजाबमध्ये आप पुढे आहे, उत्तराखंडमध्ये टक्कर सुरू आहे. गोव्याची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. यूपीत भाजपा आघाडीवर आहे. गोवा आणि पंजाबसाठी अंदाज लावणे योग्य नाही. पण अखिलेश यादव आणि त्यांची आघाडी यूपीत कडवी टक्कर देत असल्याचे राऊत म्हणाले.

गोव्यात कुणालाही…

बिहारमध्ये काय झाले ते तुम्ही पाहिले असेलच. पंजाबमध्ये अजूनही स्थिती स्पष्ट झाली नाही. सर्व राज्यांतील निकाल लागेपर्यंत उद्याची सकाळ उजाडणार आहे. गोव्यात कोणालाही बहुमत मिळेल असे वाटत नाही. खिचडी अनेक ठिकाणी बनवता येते. केवळ गोव्यातच नाही, असे म्हणत आमच्या पक्षाची महाराष्ट्राबाहेर जाण्याची सुरुवात आहे. कोणताही मोठा पक्ष राज्यातून बाहेर पडला की आधी संघर्ष करावा लागतो. म्हणून आम्ही पक्ष बाहेर नेण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे आता आम्ही थांबणार नाही, असा निर्धार राऊतांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here