फैजपूर: प्रतिनिधी
यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेले निसर्गरम्य जागृत देवस्थान श्री पंत मंदिर आनंदवन, डोंगरदे येथिल मंदिर जीर्णोध्दार व भूमी पूजन, वार्षिक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोज ,,,न करण्यात आले. यात सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. त्यावेळी एकूण १४ रक्त दात्यांनी रक्त दान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या कार्यक्रमाला प.पु. गोपाल चैतन्य जी महाराज पाल, स्वरूप दासजी महाराज डोंगरदे, स.गु. शास्त्री भक्तीकिशोर दासजी सावदा गुरुकुल, फैजपूर खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, महंत कृष्ण गीरीजी महाराज सावदा, महंत सुरेशराज शास्त्री मानेकर बाबा सावदा, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत दादा पाटील, पंत मंदिर कार्यकारी मंडळ व रक्तदाते भाविक उपस्थित होते. रक्त संकलन संजीवनी ब्लड बँक फैजपूरचे नितीन इंगळे, कांचन नेहेते, डॉ. प्रशांत सोनवणे व कर्मचारी यांनी केले.