मोठी बातमी । जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून ३ दहशतवाद्यांचा खात्मा

0
1
मोठी बातमी । जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून ३ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर, वृत्तसंस्था । जम्मू-कश्मीरच्या शोपिया परिसरात तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

श्रीनगर जम्मू-कश्मीरच्या शोपिया परिसरात तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

शोपियाच्या तुलरान परिसरात सोमवारी या चकमकीला सुरुवात झाली होती. चकमकीत मारले गेलेले तिन्ही दहशतवादी हे लष्कर ए तोयब्बाचे LeT (TRF) असल्याचे सांगण्यात येते आहे. यातील एका दहशतवाद्याची ओळख पटली असून, तो मुख्तार शाह असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी या मुख्तारने श्रीनगरमध्ये बिहारहून आलेल्या वीरेंद्र पासवान याची हत्या केली होती. त्यानंतर मुख्तार फरार झाला होता आणि शोपियामध्ये येऊन लपून बसला होता.

दरम्यान सोमवारी संध्याकाळी पुंछमध्ये झालेल्या दुसर्या एका चमकीत पाच जवानांना वीरमरण आले आहे. या चकमकीत नायब सुभेदार जसविंदर सिंग माना, नायक मनदीप सिंग, शिपाई गज्जन सिंग, सराज सिंग आणि वैसाख यांना वीरमरण आले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या कृत्याला जसास तसे उत्तर देण्यासाठी आता सुरक्षा दले सज्ज असून, दहशतवादाचा बिमोड केल्याशिवाय सैन्यदल गप्प राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here