‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ स्पर्धा;

0
3

साईमत, धुळे : प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हाव्ो, या माध्यमातून जनतेचे प्रबोधन कराव्ो, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही जपत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार’ या विषयासंबंधी सार्वजनिक गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखाव्ो साकार करून सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून मताधिकार बजावण्यासाठी मतदान नोंदणी, मताधिकारी, लोकशाहीचे सक्षमीकरण या विषयांवर प्रबोधन करतात तसेच सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात.दरम्यान, हे विषय सोयीसाठी असून, या विषयापलीकडेही जाऊन स्पर्धकांना देखाव्यातून संदेश देता येईल. मात्र त्यामध्ये लोकशाही, मतदान नोंदणी, मताधिकार यांचे महत्त्व अधोरेखित झाले पाहिजे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदारयादीत नोंदविणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नाव्ो वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडणे, तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्या-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल. यासारखे संदेशही देखाव्ो व सजावटीच्या माध्यमातून देता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांच्या स्वरूपात प्रथम- एक लाख रुपये, द्वितीय- ५१ हजार रुपये, तृतीय- २१ हजार रुपये. उत्तेजनार्थ- १० हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे असणार आहेत. स्पर्धेसाठी अर्ज व नियमावली सप्टेंबरमध्ये कळविण्यात येईल. स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक मंडळांनी सहभागी व्हाव्ो, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here