महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराजांच्या हस्ते स्वर्गरथाचे लोकार्पण

0
2

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या हिंगोणा येथे स्वर्गरथाचे लोकार्पण महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचे शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष सद्गुरू शास्त्री भक्ति प्रकाश शास्त्री होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मससाका संचालक नरेंद्र नारखेडे, सदगुरू शास्त्री भक्तीकिशोर दासजी महाराज, माजी सरपंच राजेंद्र महाजन, डॉ. व्ही. जे. वारके, माजी मुख्याध्यापक सदाशिव पाटील यांची उपस्थिती होती.
हा स्वर्गरथ स्वर्गीय प्रभाकर गाजरे व स्वर्गीय मिलिंद प्रभाकर गाजरे यांचे समरणार्थ माधवी विनीत चिरमाडे यांनी संपूर्ण खर्च करून हिंगोणा ग्रामस्थांना लोकार्पण केला. या कार्यासाठी लीलाताई गाजरे व प्रसिध्द साहित्यिक प्रा.व.पु. होले सर यांनी प्रेरणा दिली. या सामाजिक कार्याबद्दल मान्यवर पाहुण्यांनी दात्यांचे अभिनंदन केले असून सामाजिक गरजा भागविण्यासाठी धनिकांनी पुढे येऊन गाव आत्मनिर्भर करावे असे आवाहन मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी श्री जनार्दन हरिजी महाराज, नरेंद्र नारखेडे, शास्त्री भक्तीप्रकाश यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम अगदी मोजक्या मान्यवरांचे उपस्थित कोरोना नियमाचे पालन करून पार पडला. स्वर्गरथ हिंगोणा ग्रामपंचायत यांचे ताब्यात दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य छगन गाजरे, श्याम महाजन, विष्णू महाजन, भरत पाटील, रवींद्र हरी पाटील, मनोज वायकोळे, उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक फालक यांनी केले. आभार प्रदर्शन माजी मुख्याध्यापक सदाशिव पाटील सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here