सोलापूर : वृत्तसंस्था :सोलापुरात एका भाजपा नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र या राजकीय प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे रात्री 12 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षप्रवेश करण्यासाठी या भाजपा नेत्याला तब्बल पाच तास वाट पहावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर भाजपाचे शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांना तब्बल पाच तास वाट पहावी लागली. जयंत पाटील पोहोचल्यानंतर रात्री 12 वाजता हा पक्षप्रवेश पार पडला आणि अखेर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झाले. सोलापुरातील बाळे येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.