बसस्थानक परिसरात पाणी, लिंबू सरबत वाटप

0
28

जळगाव ः प्रतिनिधी
दिवसेंदिवस तापमानाचा वाढता पारा पाहता बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांचे हाल होऊ नये त्यांची तहान भागावण्यासाठी शहरातील माहेश्वरी महिला मंडळातर्फे नवीन बसस्थानक येथे थंड पाणी आणि सरबतचे वाटप करण्यात आले.

मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित होते. कार्यक्रमास तालुका तहसीलचे पदाधिकारी अध्यक्ष चंचल तापडिया यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्षा उषा राठी, सचिव स्नेहलता लाठी, प्रसिद्धीप्रमुख सरला असावा, सहसचिव सरला पोरवालांसह सदस्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here