Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»बनावट नोटा बनविणाऱ्या एकाला अटक
    क्राईम

    बनावट नोटा बनविणाऱ्या एकाला अटक

    SaimatBy SaimatMay 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी
    तालुक्यातील हिंगणा येथील एक तरूण बनावट नोटांची छपाई करत असल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी पहूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

    मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील हिंगणे येथील रहिवासी असणारा उमेश चुडामण राजपूत (वय २२) हा काल रात्रीच्या सुमारास पहूर बस स्थानक परिसरात संशयास्पद पध्दतीत फिरत होता. यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करून झडती घेतली. यात त्याच्याकडे दोनशे रूपयाची एक बनावट नोट आढळून आली. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
    या चौकशीत उमेश राजपूत याने आपण दोनशेच्या बनावट नोटांची आपल्या घरीच छपाई करत असल्याची माहिती दिली. यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी रात्री छापा टाकून बनावट नोटा प्रिंट करण्याची सामग्री जप्त केली. यात दोनशेच्या २३ बनावट नोटा आणि प्रिंटर व शाई आदी सामग्रीचा समावेश होता. या प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Jalgaon : आव्हाणे रोडवर धाडसी चोरी; ‘नाईट किंग’ बारमधून विदेशी दारू लंपास

    March 26, 2026

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.