पीक विम्यानी उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्या

0
3

अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारी पीक विम्याची रक्कम तत्काळ बँक खात्यात देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पीक विम्याची उर्वरित रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वाटेची यायची असल्याने जोखीम रक्कम शेतकर्‍यांना मिळत नाही असे विमा कंपनी प्रतिनिधींकडून सांगण्यात येते. केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांची रक्कम देण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल आहे. केंद्र व राज्य सरकारचे शेतकर्‍यांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, हेच यावरून दिसते. त्यामुळे आपण आपल्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारपर्यंत शेतकर्‍यांची व्यथा मांडावी व उर्वरित 75 टक्के अग्रीम रक्कम तात्काळ मिळवून देत दिलासा द्यावा असे नमूद केले आहे. निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
निवेदनावर शिवाजी पाटील, दिलीप पाटील, मधूकर पाटील, ज्ञानेश्‍वर पवार, रवींद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, सुधाकर पाटील, सुरेश लोहार, राजाराम ठाकरे, रवींद्र पाटील, सुरेश शिंदे, आनंदा पाटील, सुनील पाटील, आत्माराम धनगर, नंदकिशोर शिसोदे, कांतीलाल चौधरी, अरविंद शिसोदे, बाबुराव पाटील, रमेश बडगुजर, भास्कर पाटील, हिरामण चव्हाण, पंकज कोळी, चिंधू महाजन, काळू कुरेशी, ज्ञानेश्‍वर बडगुजर, अशोक लोहार, भगवान पाटील, विठ्ठल बेलदार, प्रकाश चौधरी, आत्माराम बडगुजर, रघुनाथ पाटील आदी शेतकर्‍यांची स्वाक्षरी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here