यावल ः तालुका प्रतिनिधी
येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीची कार्यकारणी अनधिकृत असल्याने त्यांनी केलेली शिक्षक पदभरती रद्द करण्याची तक्रार सोसायटीचे सभासद आणि समाजसेवक यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हा परिषद जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे 11 मे 2022 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात समाजसेवक हाजी गुलाम मुस्तफा हाजी गुलाम दस्तगीर यांनी तसेच सोसायटीचे सभासद आसिफ खान ताहेर खान,युनूस खान रशीद खान,अ.मुनाफ शे.ताहेर, नजीर खान आमिर खान यांनी नमूद केले आहे की,यावल येथील नॅशनल एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीची कार्यकारणी अनधिकृत व घटनाबाह्य असल्याने या कार्यकारी मंडळाला शिक्षण पद्धती व कोणताही आर्थिक किंवा विकास करण्याचा हक्क अधिकार नसल्याने तसेच केलेली शिक्षक वरती अति व तातडीने रद्द करण्यात यावी. या कार्यकारी मंडळाच्या घटनेच्या नियमानुसार त्यांचे जळगाव येथील धर्मदाय आयुक्त यांच्याकडील शेड्यूल वनवर ती नावे नमूद नसल्याने त्यांना संस्थेचे,सोसायटीचे व शाळेचे कोणतेही कार्य करण्याच्या मुंबई पब्लिक ट्रस्ट अधिनियमानुसार व त्यांच्या घटनेनुसार अधिकार नसल्याने केलेली शिक्षण/ शिक्षक पदभरती रद्द करण्यात यावी.
नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य लबाड आहे कारण त्यांनी आपल्या संस्थेमार्फत चालणाऱ्या विद्यालयात फेब्रुवारी, मार्च 2021 मध्ये शिक्षक भरती करून मोठा घोळ केला आहे, बोगस टीईटी उमेदवार निवड करत होते कारण ते सर्व संस्थाचालकांचे नातेवाईक आहेत त्यांची तक्रार शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, शिक्षण उपसंचालक नाशिक,जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,यांच्याकडे केली आणि शिक्षक भरती रद्द केली होती परंतु संस्थेने पुन्हा नवीन खेळ सुरू करून दि.14 मे 2022 रोजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी उमेदवारांना बोलाविले आहे. ही शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. तरी संबंधित अधिकारी यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीची शिक्षक भरती प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.