नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त भडगावात स्वच्छता अभियान

0
14

भडगाव : प्रतिनिधी
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १ मार्च रोजी भडगाव नगरीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
भडगाव नगरपरिषदेच्या परवानगीने १४३ श्रीसदस्यांच्या माध्यमातून सकाळी ठीक ८-०० ते १०-०० वाजेपर्यंत भवानी मंदिर,गिरणा वसाहत, श्रीगणपती मंदिर, जिजामाता शाळा, पोलिस वसाहत, श्रीदत्त मंदिर, बस स्थानक, बढे व्यापारी संकुल आदि परिसरातील तसेच भडगाव पेठ भागातील श्रीमारुती मंदिर, जि.प.शाळा ते स्मशानभुमी अशा एकूण ५.७ कि.मी.क्षेत्रफळ परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता अभियानांतर्गत एकूण ५.२ टन सुखा कचरा संकलीत करुन त्याची नगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्रात विल्हेवाट लावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here