धानोरा येथे शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन, स. पोलीस निरिक्षकांना दिले निवेदन

0
3

धानोरा ता.चोपडा, वार्ताहर । येथे आज गुरुवार रोजी दुपारी १ वाजता धानोरा सह परिसरातील मोजक्या शेतकऱ्यांनी कोरोना नियम पाळत विविध मागण्यांसाठी अंकलेश्वर-बऱ्हामपुर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

आज रोजी शेतकरी विविध प्रकारचे संकटांनी मेटाकुटीला आला आहे.असंख्य संकटं डोक्यावर असतांना विज वितरण कंपनीकडून मात्र विजकनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू आहे.ही विज तोडणी तात्काळ थांबवावी,कांद्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन हमी भाव द्यावा,कापसाचा हमीभाव वाढवून दहा हजार मिळावा,
केळीला बोर्डाप्रमाणे भाव मिळावा, शेतीसाठी आठ तासांऐवजी किमान १२ तास तरी विजपुरवठा व्हावा.व मिळणाऱ्या विजेप्रमाणेच बिलं आकाराणी करावी अशा विविध मागण्यांसाठी धानोरा येथे अंकलेश्वर-बऱ्हामपुर महामार्गावर असलेल्या जळगाव चौफुलीवर संतोष सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी कोरानाचे सर्व‌ नियम पाळून मोजक्या संख्येने एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले.यावेळीकाही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.या संतोष सपकाळे यांनी आंदोलनावेळी बोलतांना शेतकऱ्यांना वर आलेल्या संकटांचा पाढाच वाचला. व शेतीच्या आड येणाऱ्या समस्या सोडवून शेतीमालाला योग्य भाव मिळवून द्या. तरच शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचेल तरच देश वाचेल.याची जाणीव ठेवत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या असे आव्हान आयोजक सपकाळे यांनी केले.शेतकरींचा आवाज वरिष्ठांपर्यन्त पोहचावा म्हणून सर्व मागण्यांचे निवेदन अडावद पो.स्टे.चे स.पोलीस निरिक्षक किरण दांडगे यांना देण्यात आले.यावेळी संतोष सपकाळे यांच्यासह भरत बी.कोळी,सी.एस.सपकाळे, जगदीश भोई, विनायक पितांबर पाटील बिडगाव, विष्णू बाविस्कर पुणगाव,नवल ठाकरे वासुदेव ठाकरे,चंदु साळुंखे विठ्ठल पाटील,दिलीप बाविस्कर, देविदास साळुंके, रविंद्र पाटील,यांच्यासह मोजके शेतकरी उपस्थित होते.तर शांततेसाठी अडावद पो.स्टे चे स.पोलीस निरिक्षक किरण दांडगे,एएसाय सुनील तायडे,पो.का.कदीर शेख, जयदीप राजपूत, योगेश गोसावी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here