दिग्दर्शक मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

0
2

मुंबई: प्रतिनिधी
महेश मांजरेकरांच्या “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा” या चित्रपटामध्ये अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना आता हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा” या चित्रपटात काही वादग्रस्त दृष्यांवरून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चित्रपटात लहान मुलांशी संबंधित काही आक्षेपार्ह दृश्यांवरून माहिम पोलीस स्टेशनमध्ये ‘पोक्सो’ आणि ‘आयटी’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आली होती. “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा” या चित्रपटामध्ये किशोरवयीन मुलांच्या भविष्याची एक वेगळी कथा प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र, कथेची पार्श्वभूमी गिरणी संप, गिरणगावामधील चाळींशी संबंधित आहे. किशोरवयीन मुलाचे नात्यात प्रौढ महिलेशी संबंध चित्रपटामध्ये दाखवण्यात आले होते. यावर गिरणगावात अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. महेश मांजरेकर यांच्या चित्रपटामुळे गिरणगाव आणि चाळीमधील मुलांविषयी दिशाभूल होत असल्याचा मुद्दा अनेकांनी मांडला होता.
यामुळेच मुंबई पोलिसांनी महेश मांजरेकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर मुंबई सत्र न्यायालयात पोक्सो कोर्टाने चौकशी करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता. या अगोदर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली होती. ज्यामध्ये अटकेची कारवाई करण्यापासून मुंबई पोलिसांना रोखण्यात आले होते, अशी मागणी मांजरेकर यांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारकने याला विरोध करण्यात आला होता. यामुळे हायकोर्टाने मांजरेकरांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत, सोमवारी नियमित खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश महेश मांजरेकरांना दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here