यावल (सुरेश पाटील)
सोमवार दि.२१रोजी यावल येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान नऊवे टप्प्यात पोहोचले असून या उपक्रमाला हिंगोणा ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावल तालुक्यातील हिंगोणा गावातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा,याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास नऊवे सत्राला सुरुवात करण्यात आली हे अभियान तालुक्यातील हिंगोणा येथील विकास सोसायटीचे गाऊंडवर घेण्यात आले.या अभियानाचा एकूण ४८९ लाभार्थ्यांनी या लाभ घेतला.यावेळी मोफत ई-श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रुकसाना फिरोज तडवी (सरपंच ),फिरोज तडवी,मनोज वायकोळे,महेंद्रसिंग पाटील, ज्ञानुसिंग पाटील,संतोष सावळे, शशिकांत चौधरी,सागर महाजन, विष्णू महाजन,सुभाष गाजरे, चंद्रकांत महाजन,युवराज गाजरें,बिसा तडवी,गौरव बाविस्कर,हरेश भोळे,तुषार कोळी,अतुल गाजरें,युगंधर नेमाड़े, यश कोळी,शुभम कोळी,भगवान पाटिल,कपिल कोळी,महेश राणे, हर्षल धनगर,स्वाती सपकाळे, वीणा लाखारा,चारुलता गुडवे, उशा पाटील,रंजना पाटील,आशा तडवी,मिनाक्षी कोळी,आदींची उपस्थिती होती.सदरील अभियानास सागर लोहार,मनोज बारी,विशाल बारी,हर्षवर्धन मोरे,अक्षय राजपूत,चेतन कापुरे शुभम सोनवणे,यांचे योग्य सहकार्य लाभले.