टॉवरवरून पडल्याने मजूराचा मृत्यू

0
4

साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी
तालुक्यातील भोणे येथील सुझलॉन कंपनीच्या टॉवरवरुन पडल्याने मजूराचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली.
तालुक्यातील भोणे येथे उभारण्यात आलेल्या सुझलॉन कंपनीच्या टॉवरवर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कंत्राटदाराकडून मेंटेनन्सचे काम सुरु होते. याव्ोळी एक मजूर विनासुरक्षा टॉवरवर चढला. मात्र, त्याचा अचानक तोल गेल्याने तो सरळ जमिनीवर कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here