Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»चावीशिवाय स्टार्ट होणारी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात
    राज्य

    चावीशिवाय स्टार्ट होणारी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

    SaimatBy SaimatMarch 22, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : भारतात लोक घराजवळ कुठेही जाण्यासाठी, स्थानिक बाजारातून सामान आणण्यासाठी स्कूटर घेऊन जाणं पसंत करतात. कदाचित अशाच गरजा लक्षात घेऊन क्रेयॉन एनव्ही कंपनीने भारतीय बाजारात एक लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर चावीशिवाय सुरू केली जाऊ शकते. कंपनीने ही स्कूटर चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे, ज्यामध्ये पांढरा, काळा, निळा आणि सिल्व्हर या रंगांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) किंमत 64,000 रुपये ठेवण्यात आली आहे आणि ती अनेक उत्तम फीचर्स आणि उत्तम बूट स्पेससह येते. तसेच, यात कीलेस स्टार्टअप सिस्टम आहे. ही स्कूटर देशभरातील 100 हून अधिक किरकोळ ठिकाणी खरेदी केली जाऊ शकते. या स्कूटरला मोटर आणि कंट्रोलवर 24 महिन्यांची वॉरंटी मिळेल.
    कंपनीने यामध्ये पुढे आणि मागे जाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे, ज्याच्या मदतीने ही स्कूटर अगदी लहान जागेतही पार्क करता येते. या इलेक्ट्रिक स्कूटरवर 14 पैसे प्रति किलोमीटर इतका खर्च करावा लागेल. ही किंमत खूपच कमी आहे कारण आपल्या सर्वांना पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती माहितच आहेत. सर्व दुचाकी फक्त पेट्रोल इंधनावर चालतात, त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर एक परवडणारा पर्याय ठरू शकते.
    सिंगल चार्जमध्ये 160KM रेंज, चावीशिवाय स्टार्ट होणारी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, लायसन्सची गरज नाही
    भारतात लोक घराजवळ कुठेही जाण्यासाठी, स्थानिक बाजारातून सामान आणण्यासाठी स्कूटर घेऊन जाणं पसंत करतात. कदाचित अशाच गरजा लक्षात घेऊन क्रेयॉन एनव्ही (Crayon Envy) कंपनीने भारतीय बाजारात एक लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.
    या स्कूटरच्या टेक फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात जिओ टॅगिंग, सेंट्रल लॉकिंग सारखे फीचर्स आहेत. तसेच, या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि मोबाइल चार्जिंग पोर्ट आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, यात मॅन्युअल हेडलाइट्स देण्यात आले आहेत, जे आकर्षक डिझाइनसह कमी प्रकाशातही चांगली व्हिजिबिलिटी देतात.
    या स्कूटरमध्ये कम्फर्ट सीट्स देण्यात आल्या आहेत आणि जे लोक जास्त वेळ रायडिंग करतात त्यांच्यासाठी ही स्कूटर एक चांगला पर्याय ठरू शकते. ही लो स्पीड स्कूटर आहे आणि तिचा टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतका आहे. ही स्कूटर चालवण्यासाठी चालक परवाना आवश्यक नाही.
    स्कूटर 250 वॅट्स BLDC मोटरसह सुसज्ज आहे. यात ट्यूबलेस टायर, डिस्क ब्रेक आणि 150 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देखील मिळतो. ही स्कूटर सिंगल चार्जवर 160 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Accident : बस व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    March 31, 2026

    मध्यपूर्वेतील संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेला इशारा; IMF कडून महागाई वाढीचा अंदाज

    March 31, 2026

    Kolhapur : शेतीविवादातून दुहेरी खून; वडील आणि मुला मृत, मोठा भाऊ पोलिसांच्या ताब्यात

    March 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.