कुसुमताई फाऊंडेशनला ‘रत्नदुर्ग कोकण रत्न’ पुरस्कार

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील कुसुमताई फाऊंडेशन (निस्वार्थ अन्नसेवा) जळगाव शहरातील रस्त्यावरील निराधार आजी-आजोबा व गरीब गरजूंना रोज भुक क्षमविण्याचे काम 5 वर्षापासून सतत करत आहे. अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप करणे तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. याकामाची दखल घेवून रत्नागिरी येथील जय मल्हार सामाजिक चॅरिटी ट्रस्टच्यावतीने जागतिक महिलादिनी सुप्रसिध्द अभिनेत्री किशोरी अंबिके यांच्या हस्ते राज्यस्तरीय 2022 चा रत्नदुर्गकोकण रत्न पुरस्कार मॅडेल, ट्रॉफी, प्रशस्ती पत्रात मानाचा फेटा शाल देवून गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल कुसुमताई फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here