कजगाव येथील तलाठी कार्यालय चे उडणाऱ्या पत्रांना दगडाचा साहरा

0
27

प्रतीनिधी भडगाव 

कजगाव ता.भडगाव कजगाव चे मंडळ कार्यालय तलाठी कार्यालय तसेच पोलीस मदत केंद्र यांच्या उडणाऱ्या छताला दगडा चा सहारा घेत छत वाचवावे लागत आहे मोडकळीस राज्यआलेल्या या वास्तू च्या जागी नवीन वास्तू उभारण्यात यावी अशी मागणी केली जात आहे
कजगाव हे परिसरातील पन्नास खेड्याचे व्यापारी केंद्र मोठी बाजारपेठ असल्याने सदैव येथे यात्राच भरते अशा या महत्वपूर्ण गावात तलाठी कार्यालय, मंडळ कार्यालय, पोलीस मदत केंद्र हे एकाच वास्तुत कार्यरत आहे मात्र सदर ची वास्तु हि पुर्णपणे मोडकळीस आली आहे वास्तविक पाहता मंडळ कार्यालय व तलाठी कार्यालय हे दोघ कार्यालय अत्यंत महत्त्वाचे आहे या ठिकाणी महत्वाचे कागदपत्रे असतात मात्र या कार्यालया वरील सिमेंट चे पत्रे पुर्ण जीर्ण झाली आहेत अनेक ठीकाणी पत्र्याला खड्डे पडली असल्याने या खड्यातून ऊन,वारा,पाऊस विना दिक्कत आत येत आहेत या छताचे पत्रे कधीही उडू शकतात या साठी या सिमेंट पत्र्यावर भारदार वजनाची दगड ठेवण्यात आली आहेत मात्र जीर्ण झालेल्या या पत्र्या मधुन दगड आत आलाच तर मात्र यात मोठी दुर्घटना घडु शकते त्याच प्रमाणे पावसाळ्यात जर पत्रे तुटली तर पाणी सरळ आत आल्यानंतर यातील महत्वाची कागदपत्रे हे पाण्यात भिजत नष्ट होऊ शकतात या बाबीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे असल्या नंतर देखील या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे
*वास्तु तळाशी
रस्ता उंच
सदरची वास्तु हि कजगाव भडगाव रोड लगत असुन कधी काळी बनलेली हि वास्तु तळाला आहे तर या वास्तूच्या समोरून जाणारा रोड उंच झाल्याने पावसाळ्यात निश्चितच या ठिकाणी तलाव बनु शकेल त्या प्रमाणे या वास्तु च्या परीसरात घाण देखील असल्याने परिसरात सरपटणारे प्राणी चा वावर देखील असल्याने त्या दृष्टीने देखील सदर ची वास्तु सुसज्ज होणे गरजेचे आहे
उडणाऱ्या पत्र्यांना
दगडाचा सहारा
सदर ची वास्तु हि सर्वच दृष्टिकोनाने घातक झाली आहे उडणाऱ्या पत्र्यांना दगडाचा सहारा दिला आहे मात्र हेच दगड धुवाधार पावसाने कींवा वादळ वाऱ्याने खाली आले तर मात्र हेच दगड काहि जीव घेतील असली परिस्थिती या कार्यालयाची झाली आहे
पोलीस मदत केंद्रावर
बसली पत्रे
शेजारीच असलेल्या पोलीस मदत केंद्रावर मागे लोखंडी पत्रे टाकण्यात आल्याने छताचा धोका पाणी गळण्याचा धोका टळला आहे मात्र जमीन लगत असलेल्या या वास्तुल सरपटणाऱ्या प्राण्यांचा पावसाळ्यात वाहणाऱ्या पाणी आत घुसण्याचा धोका मात्र कायम आहे
वास्तु तात्काळ नवीन
बनविण्याची मागणी
तलाठी ,मंडळ कार्यालय पोलीस मदत केंद्र या ठीकाणी नित्याची होणारी गर्दि या कार्यालयात रहात असलेली महत्वाची कागद पत्रे या साऱ्या बाबीचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने तात्काळ या कार्यालयाच्या नुतन वास्तु चे काम मार्गी लावावे अशी मागणी होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here