जळगाव : साईमत लाईव्ह
गत आठवड्यात जिल्हा भर गाजा वाजा झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील मोठ्या घोटाळ्याची खरी सूत्रधार हे दुसरे तिसरे कोणी नसून वरिष्ठ अधिकारीच आपल्या कनिष्ठांना आदेशित करून अभय देतांना समोर आलेत.
पी एम पाटील नामक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात असलेले कर्मचाऱ्यांनी शासकीय कागदपत्रे खाजगी ठिकाणी नेवून आलेल्या शासकीय कामांची वाटप फक्त आणि फक्त आर्थिक धोरणावर करीत जवळपास प्रत्येक कामाचे १० टक्के इतपत रुपये घेऊन सरळ सरळ बाहेर कामे वाटप केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर जेव्हा सुशिक्षित बेरोजगारांनी ठिय्या आंदोलन केले तेव्हा नाममात्र काम देऊ चे आश्वासन देऊन त्या अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. लेखी तक्रारींची दखल न घेत त्या अधिकाऱ्याला तूर्तास दुसऱ्या विभागात बदली करून अंडरग्राउंड केले आहे.
प्रकरणाचा उलगडा झाल्यापासून पी एम पाटील हे नॉट रिचेबल आहेत. वरिष्ठांनी म्हणजेच श्री ढिवरे तसेच श्री मोहन ह्यांनी आम्ही माफक कार्यवाही करून प्रशासकीय चौकशी होईल असे सांगतिले होते. परंतु खरे सूत्रधार तेच असल्यामुळे कुठलेही कार्यवाही न होता प्रकरणावर सरळ सरळ माती लोटण्यात आली आहे.
सदर प्रकरणात दोषी अधिकाऱ्या वर बडतर्फी कार्यवाही होत. फौजदारी गुन्हा दाखल होण्याची कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु संगण मताने सुरु असलेल्या ह्या झोल कारभारात सुशिक्षित बेरोजगारांना पुन्हा निराशाच हाती.
विद्यमान जिल्हा परिषदेचा कारभार निवडणुकी अभावी प्रशासक चालवीत आहेत. आता शासकीय अधिकारी श्री पंकज आशिया हे काय कार्यवाही करून आपली भूमिका जनते समोर आणतील ह्याची जिल्हा वासीय आतुरतेने वाट बघत आहेत.