शहादा रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

0
8

साईमत, शिरपुर : प्रतिनिधी
शहादा रस्त्यावर वरूळ शिवारात न्यु तारा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वरुळ येथील २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे घडली .याप्रकरणी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कैलास आत्माराम मराठे (वय २५) रा. वरूळ ता. शिरपुर असे अपघातात मयत तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील वरूळ येथे कैलास आत्माराम मराठे हा तरुण सोमवारी रात्री राहत्या घराच्या अंगणात झोपला होता. रात्री डासांचा त्रास होत असल्याने तो मंगळवारी पहाटे साडे तीन चार वाजेच्या सुमारास वडिलांना रस्त्यावर पायी फिरण्यासाठी उठून निघाला.

याबाबत त्याने वडिलांना सांगितले आणि शिरपुर शहादा रस्त्यावरून पायी जात असतांना न्यू तारा पेट्रोलपंपाजवळ त्यास एका अज्ञात चारचाकी भरधाव वाहनाने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यास पहाटे ६ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिनीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयातील डॉ. संदेश आगळे यांनी कैलास मराठे यास तपासणी करून मयत घोषित केले. पुढील तपास पोहेकॉ नंदाळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here