साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
रेड रिबीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच आय.सी. टी.सी.विभाग ग्रामीण रुग्णालय, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच युवा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विजयानंद वारडे होते. यावेळी प्राचार्य डॉ.ए.डी.वळवी, उपप्राचार्य प्रा.एस.एस.पालखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे व रेड रिबीन क्लबचे समन्वयक डॉ. अभिजीत जोशी, प्रा. प्रताप साळवे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ज्योती महाजन, प्रा. रेखा बिरारी, आयसीटीसी विभागाचे समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी, राजेश्वर काकडे, गणेश कुंभार, अमोल सूर्यवंशी, अतुल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी आर.के. एस.के. समुपदेशक गणेश कुंभार यांनी युवा कसा असावा? याविषयी मार्गदर्शन केले. तसेच एचआयव्ही एड्स व गुप्त रोग या संवेदनशील विषयासंबंधी युवकांमध्ये जनजागृती व्हावी, याकरीता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला अनुसरून समुपदेशक शिंपी यांनी एचआयव्ही एड्स व गुप्त रोग यासंदर्भात सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात महाविद्यालयाची विद्यार्थिनी फाल्गुनी चव्हाण, पूजा चव्हाण, मृणाल भावसार यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आला.
युवक-युवतींना युवा दिनानिमित्त दिली शपथ
तरुणांसाठी हरितक्रांती जगाच्या स्वस्त विकासासाठी हरितक्रांती तरुणांची माहिती पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले. पोस्टर प्रदर्शन घेण्यात आले. एचआयव्हीविषयी पोस्टर प्रदर्शनाद्वारे जनजागृती केली. तसेच युवक-युवतींना आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त शपथ देण्यात आली. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. अभिजीत जोशी तर आभार प्रा. प्रताप साळवे यांनी मानले.