एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
साईमत/जळगाव /प्रतिनिधी :
तालुक्यातील वावडदे गावातील मातोश्री नास्ता सेंटरजवळ वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरूणाला चार जणांनी धारदार वस्तू आणि लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी, २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव तालुक्यातील वावडदे गावातून लोकेश धनसिंग पाटील (वय २६, रा.दहीगाव, ता. पाचोरा) दुचाकीने २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घरी जात होता. त्यावेळी रस्त्यावरील मातोश्री नास्ता सेंटर दुकानासमोर लोकेश पाटील याची दुचाकी अडविली. वाहनाला कट का मारला, या कारणावरून संशयित आरोपी बंटी उर्फ दीपक पाटील, हरीष पाटील दोन्ही (रा. रायसोनी नगर जळगाव), करण पाटील आणि एक अनोळखी यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली.
त्यानंतर एकाने धारदार वस्तू आणि लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर लोकेश पाटील याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. समाधान टहाकळे करीत आहे.
