Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»गावठी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतूससह तरूणाला अटक
    क्राईम

    गावठी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतूससह तरूणाला अटक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

    विनापरवाना गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतूस घेऊन भुसावळ शहरातील यावल नाका येथे दहशत निर्माण करणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ शहर पोलिसांनी शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता अटक केली. त्याच्यावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहित सुनील सपकाळे (वय २१, रा. अंजाळे, ता. यावल) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

    सविस्तर असे की, शहरातील यावल नाका परिसरात रोहित सपकाळे हा तरुण दुचाकीवर येऊन हातात गावठी बनावटीचा कट्ट्याचा धाक दाखवत दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने कारवाई करत संशयित आरोपी रोहित सपकाळे याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतूस आणि दुचाकी (क्र.एमएच १९ डीएफ २७९८) असा ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

    याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोहित सुनील सपकाळे यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक फौजदार इकबाल इब्राहिम सय्यद करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.