यावल : तालुका प्रतिनिधी
अमळनेर येथील गौशाळेची जनसेवा आणि धार्मिक विधीयुक्त,पर्यावरण पूर्वक अग्निसंस्कार कसा करावा हे यावल येथील देशमुख वाड्यातील नागरिकांनी आज प्रथम अनुभवले.
यावल येथील मोठा मारोतीची सेवा करणारे आणि मोठा मारोतीवर दृढ श्रद्धा असलेले शरद शिंदे यांची पत्नी सौ.कल्पना शरद शिंदे यांचे काल मंगळवार दि.28 रोजी दुपारी एक वाजता अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर आज सकाळी नऊ वाजता धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करताना यावल येथील हिंदू स्मशानभूमीत अमळनेर येथील जनसेवा फाउंडेशन व अमळनेर गौशाळा संचालक प्रा.डॉ.अरुण कोचर, नानाभाऊ धनगर,सुयोग धनगर यांनी मुंबई येथील के.एल.झवेरी यांचे धार्मिक विचारांना प्राधान्य देत समाजहिताचे निर्णय आणि उद्दिष्टानुसार धार्मिक पद्धतीने गायीच्या शेणापासून तयार केलेली गौरी,गाईचे तूप,शुद्ध कापूर,तुळशीचे कोरडे झालेले झाड इत्यादी माध्यमातून तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या मुख्य उद्देशाने आणि वृक्षतोड पासून वृक्षांचे संरक्षण कसे करता येईल याची जनजागृती करण्यासाठी आणि या सोबत गौमातेच्या संवर्धनासाठी दोन पैसे प्राप्त कसे होतील इत्यादी समाज उपयोगी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष वरील साहित्यासह स्मशानभूमीत उपस्थित राहून उत्कृष्ट प्रकारची लक्षवेध वेधणारी रांगोळी काढून अंत्यविधी केला हे प्रत्यक्ष आज पहिल्यांदा यावल शहरातील देशमुखवाड्यातील नागरिकांनी अनुभवले याआधी यावल शहरातील सर्वांना परिचित असलेले व्यापारी सचिन मिस्त्री यांच्या मातोश्रीचा अंत्यविधी सुद्धा याच पद्धतीने करण्यात आला होता अशा प्रकारे यावल शहरात धार्मिक पद्धतीने अंत्यविधी करण्याची प्रथा समाजात रूढ होत आहे आणि या माध्यमातून गौसंवर्धन सुद्धा विकसित होणार असल्याने या धार्मिक विधीकडे विशेष करून नागरिकांचे लक्ष वेधत चालले आहे.
कोणाचाही मृत्यू झाल्यानंतर संबंधितांनी अमळनेर येथील जनसेवा फाउंडेशन व गौशाळेशी दिलेल्या 9422972200/ 9075507420/ 8766418824 या कोणत्याही एका मोबाईल नंबर वर संपर्क साधल्यास ठराविक खर्च घेऊन गायीच्या शेणा पासून तयार केलेल्या गौऱ्या व इतर काही साहित्यांसह स्वतःच्या वाहनाने गौरक्षक हजर होतात व ते स्वतः अंत्यसंस्कार करून देतात.जळगाव जिल्ह्यात व जिल्हा परिसरात गोरक्षकांनी कोरोना काळात दहा ते पंधरा हजार लोकांवर अशाप्रकारे धार्मिक विधीने अंत्यसंस्कार केल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.