साईमत, शिरपूर : प्रतिनिधी
भरधाव व्ोगाने येणाऱ्या ट्रकची महिलेला जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात बुधवारी सायंकाळी ट्रकचालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली.
लवा उर्फ लहू उर्फ मणिराम उर्फ कालू भिल (वय 27) आणि त्यांची पत्नी भारती लवा भिल (वय 20) (दोन्ही रा. कळमसरे ता. शिरपूर) हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाच्या चौफुलीवर सोमवारी दुपारी थांबलेले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास केए 25 एए 6858 या क्रमांकाचा ट्रक भरधाव व्ोगाने आला. ट्रक व्ोगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकची धडक सावळदे गावाच्या चौफुलीवर थांबलेल्या महिलेला बसली. यात ती रस्त्यावर फेकली गेली. तिच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत महिलेचा पती लवा भिल याने बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने ट्रकचालक बबलूसिंग रामसिंग राणावत (वय 29, रा. बाबडी ता. जहाजपूर जि. भिलवाडा, गाजस्थान) याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ट्रकचालकाला अटक करण्यात आली. पोलिस नाईक पवन ईशी घटनेचा तपास करत आहे.