फैजपूर नगरपालिकेतील घनकचरा भ्रष्टाचाराबद्दल वरिष्ठांकडून चौकशी कधी?

0
29

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

येथील नगरपालिकेतील घनकचरा प्रकल्पाबाबत ठेकेदाराची मनमानी व नगरपालिकेतील अधिकाऱ्यांची डोळेझाक प्रकरणी वरिष्ठ दखल घेऊन संबंधितांवर कधी कारवाई करतील? असा प्रश्‍न जनतेतून उपस्थित होत आहे. याप्रकरणी कोणाकोणाचे हात भाजले गेले त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून जनतेच्या पर्यायाने शासनाच्या पैशांची लूट थांबवावी. संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.

नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या गलिच्छ कारभाराबाबत शुक्रवारी ८ मार्च रोजी दैनिक ‘साईमत’ने ‘घनकचरा पेटवून संपवण्याचा अजब प्रकार : लाखो रुपयांची बिले मात्र खर्ची… डोळ्यावर पट्टी बांधून काम करण्याची नगरपालिकेची भूमिका’ अशा ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे नगरपालिका गोटात खळबळ उडाली होती. तसेच नागरिकांनी वृत्ताचे स्वागत केले. त्यात फैजपूर नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रभारीराज सुरू आहे. प्रत्यक्ष केलेल्या कामाची शहानिशा व चौकशी न करता घाईगर्दीत बिल मंजूर केले जात असल्याने भ्रष्टाचार बोकाळला आहे.

गेल्या काही कालखंडापासून नगरपालिकेच्या कळमोदा रस्त्यावरील घनकचरा प्रकल्पात ओल्या व सुक्या घनकचऱ्याची वर्गवारी करून त्यावर योग्य प्रक्रिया करणे पूर्णपणे थांबले आहे. तेथील मशिनरी धूळ खात पडलेली आहे. संपूर्ण कामाचा नगरपालिकेने ठेका दिलेला आहे. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात सोईने भ्रष्टाचार करून तो हेतूपूरस्कर पेटवून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here