नॉलेज बेस, स्किल बेस्ट एज्युकेशन पॉलिसी आपण राबवणार : नंदकुमार बेंडाळे

0
27

साईमत, जळगाव, प्रतिनिधी,

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सचिव ॲड.प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले,व्यवस्थापन सदस्य भालचंद्र पाटील , भरत अमळकर ,डॉ. हर्षवर्धन जावळे ,डॉ.शिल्पा बेंडाळे, प्रा.अशोक राणे, श्रीकांत मनियार, प्राध्यापक संजय भारंबे, प्रा.अनिल राव ,रुपेश चिरमाडे,संजय प्रभुदेसाई हे मंचावर उपस्थित होते. चंद्रयान तीन मोहीम यशस्वी केल्याबद्दल इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा अभिनंदनचा ठराव यावेळी करण्यात आला. साहेबराव भुकन यांच्या ‌‘विनोबा आणि शिक्षण‌’ या ग्रंथासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान गद्य लेखन कर्मवीर भाऊराव पाटील राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सचिव प्रमोद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी पुढील पाच वर्षातील व्हिजन सर्वांसमोर मांडले. यात केसीई सोसायटीच्या विविध मान्यता प्राप्त शाखा यांच्यात समन्वय घडवून विद्यार्थी हितासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अभिनव उपक्रम राबवून नॉलेज बेस, स्किल बेस्ट एज्युकेशन पॉलिसी आपण राबवणार असल्याचे भाकीत केले आणि लवकरच क्लस्टर विद्यापीठ आपण होवू, असे सुतोवाच केले. यासोबतच आगामी काळात आर्किटेक कॉलेज, डी.फार्म, बी.फार्म महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ॲड. प्रमोद पाटील यांनी मानले.

संस्थेच्या या कर्मचाऱ्यांचा केला सत्कार
संस्थेतील विविध शाखामधील प्राचार्य, प्राध्यापक कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यात प्राचार्य संजय भारंबे,विद्यापीठ पाटील, प्रा.केतन नारखेडे,डॉ. भूपेंद्र केसुर, डॉ. मनोज पांडे ,डॉ.वसीम आर शेख, डॉ.चंद्रमणी लभाणे, प्रा. सुरेखा पालवे,डॉ.कैलास खडसे,डॉ.जयवंत मगर, प्रा.जयप्रकाश चौधरी, डॉ.मनोजकुमार चोपडा, डॉ.भूषण कविमंडन, प्रा.जयश्री महाजन आदी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here