साईमत लाईव्ह एरंडोल प्रतिनिधी (समाधान वाघ)
“क. ब. चौ. उमवी विद्यापीठ जळगावच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी राबवले स्वच्छता अभियान कढोली ता. एरंडोल गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर, बाजार पट्ट्यात तसेच गावातील मुख्य चौकात प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बॉटल्स जमा करण्यात आल्या. व स्वच्छते विषयी गावात जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ देखील या उपक्रमात सहभागी झाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यानी केले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश:- गावात ग्रामस्वच्छते विषयी जनजागृती व जाणीवजागृती निर्माण करणे हा होता. यावेळी कढोली गावातील ग्रामसेवक पंकज पाटील, ईश्वर कोळी, ज्योती कोळी, माझी उपसरपंच भूषण भोई. नेहरू युवा केंद्राचे मुकेश भालेराव तसेच समाजकार्य विभागातील:- प्रा.डॉ. दिपक सोनवणे, प्रा विनेश पावरा विद्यार्थी:- सुभाष पाटील, योगेश माळी, किरण पवार, दिशा ढगे, भारती पावरा, मेरसिंग पावरा, जितेंद्र शिरसागर, भिमसिंग वसावे आदि उपस्थित होते.