यशस्वी लोकांचे उदाहरणे देऊन करिअरसंदर्भात मार्गदर्शन
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
येथील महालपुरे मंगल कार्यालयात महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखेतर्फे रविवारी गुणवंत, ज्ञानवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी यादवराव विठ्ठल सिनकर होते. यावेळी संस्कार वाणी मंचचे प्रमुख योगेश येवले होते. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन करून झाली.
प्रास्ताविकात योगेश शेंडे यांनी डी.आर.कोतकर यांनी म.वा.युवा मंच राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी एकत्र कुटुंब पद्धतीतील फायदे, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना अभ्यासासोबत कौशल्य असणे महत्त्वाचे आहे, असे मनोगत व्यक्त केले. योगेश येवले यांनी समाज खेड्यातून शहराकडे, परदेशात स्थलांतरित होत असल्याची चिंता व्यक्त केली. प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी यशस्वी लोकांचे उदाहरणे देऊन करिअर संदर्भात मार्गदर्शन केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी विजय सोनजे, संदीप महालपुरे, प्रवीण शेंडे, गणेश सिनकर, किरण अमृतकर, संजय वाणी, विशाल ब्राह्मणकर, प्रकाश येवले यांच्यासह वाणी युवा मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अशोक बागड, रमेश महालपुरे, प्रा.लक्ष्मण सिनकर तर आभार विवेक ब्राम्हणकर यांनी मानले.