नार-पारच्या लढ्यात वैशाली सूर्यवंशी यांची उडी

0
36

माजी खा.उन्मेष पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

नार-पार प्रकल्पासाठी माजी खा. उन्मेष पाटील यांनी केलेल्या आंदोलनास शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी पाठिंबा देऊन प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी केली. राज्य सरकारने नार-पार प्रकल्पाला मंजुरी देण्याचा आव आणला असला तरी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी आधीच हा प्रोजेक्ट रद्द केल्याची घोषणा करून महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला विरोध म्हणून माजी खासदार पाटील यांनी गिरणा नदीच्या पात्रात आंदोलन सुरू केले. ते रात्रभर गिरणा नदीच्याच पात्रात उभे होते.

नार- पार प्रकल्प पूर्ण झाल्यास चाळीसगाव व पाचोरा-भडगाव अशा दोन्ही मतदारसंघाला लाभ होणार आहे. त्यामुळे गिरणाकाठ समृध्द होणार असल्याने पंतप्रधान मोदी यांनी याला मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी वैशाली सूर्यवंशी यांनी केली. यावेळी पक्षाचे संपर्क प्रमुख सुनील पाटील, माजी दीपकसिंग राजपूत, संपदा पाटील, ॲड.अभय पाटील, उध्दव मराठे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here