Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»धरणगावात रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला मंजुरी
    धरणगाव

    धरणगावात रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला मंजुरी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 4, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर आहे. येथे आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी, यासाठी उपजिल्हा रूग्णालयाच्या मंजुरीसाठी राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाळधी येथील दौऱ्यात त्यांनी धरणगाव येथे उपजिल्हा रूग्णालयाची लवकरच निर्मिती करण्यात येणार असल्याचे घोषितही केले होते. रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले आहे. उपजिल्हा रूग्णालयासाठी बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड केली आहे. त्यामुळे येथे आता सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रूग्णालय बांधकाम केले जाणार आहे. यामुळे धरणगाव वासीयांची मागणी पूर्ण झाली असून धरणगावसह परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे. तसेच धरणगावात पेढे वाटून फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

    याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या १९ सप्टेंबर २०२२ आणि १३ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रानुसार उपजिल्हा रूग्णालय मंजुरीसाठी सिव्हील सर्जन डॉ. किरण पाटील यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार १३ मार्च २०२३ ला सहसंचालक आरोग्यसेवा डॉ. विजय कदम बांडे यांच्या प्रस्तावानुसार ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचा परिपूर्ण प्रस्ताव प्रधान सचिव व मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

    उपजिल्हा रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा अशा

    बालकवी ठोंबरे यांच्या स्मारका लगतच्या परिसरात होणाऱ्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण, आंतरुग्ण, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसुतीगृह, शस्त्रक्रिया गृह, शवविच्छेदन विभाग, वाहन सुविधा (रुग्णवाहिका), नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण (टीबी), न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्र तपासणी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातर्गंत आरोग्य सुविधा, मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया, एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडून मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र, रक्त पुरवठा केंद्राद्वारे रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

    ट्रामा केअर सेंटरला लवकरच मंजुरी मिळणार…!

    धरणगाव येथील ग्रामीण रुगालायाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे धरणगाव व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. धरणगावला लवकरच ट्रामा केअर सेंटरला मंजुरी मिळणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठीही लवकरच निधी मंजूर करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम प्रक्रियेत आहे.

    – ना.गुलाबराव पाटील, पालकमंत्री

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.