Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»बेरोजगार शिक्षकांनी संस्था चालकांच्या गोरखधंद्याला बळी पडू नये? पत्रकार परिषदेत आ.किशोर पाटील यांचे आवाहन
    पाचोरा

    बेरोजगार शिक्षकांनी संस्था चालकांच्या गोरखधंद्याला बळी पडू नये? पत्रकार परिषदेत आ.किशोर पाटील यांचे आवाहन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मतदारसंघातील तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता, शिक्षण आयुक्त, शिक्षण अधिकाऱ्यांना आमदारांचा इशारा

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था चालक निवडणूक लढण्याच्या इच्छेने कामाला लागले आहेत. अश्या परिस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघात डी.एड्‌, बी.एड्‌. बेरोजगार शिक्षक, विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून नोकरी देण्याच्या नावावर त्यांच्याकडून लाखो रुपये घेण्यासाठी अश्या बेरोजगार शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या शोधात आहे. त्यांना नियुक्तीचे बोगस अप्रुव्हल देऊन बेरोजगार शिक्षकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन आ.किशोर पाटील यांनी त्यांच्या निवासी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर उपस्थित होते.

    ते पुढे म्हणाले की, असाच प्रकार गेल्या पाच वर्षांपूर्वी शिंदे शिक्षण संस्थेत झाला होता. संस्था चालकांनी मतदार संघांतील सुमारे २०/२५ बेरोजगार शिक्षकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना रिटायर्ड शिक्षण अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्यांचे अप्रूव्हल देवून त्यांची फसवणूक केली होती. यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर मी हा प्रश्न विधानसभेत उचलला होता. तेव्हा या प्रकरणातील संबधित अधिकारी निलंबित करण्यात आले. संस्था चालकांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, हे गुन्हे मॅनेज करण्यात आले. मी कोणत्याही विद्यार्थी किंवा बेरोजगार शिक्षकांच्या नोकरी विरोधात नाही. परंतु त्यांनी निवडणुकीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत संस्थेत नोकरी लावून देण्यासाठी ‘आ’वासून बसलेल्या शिक्षण संस्था चालकांच्या गोरखधंद्याला बळी पडू नये, हा माझा प्रामाणिक हेतू आहे. २०११/१२ पासून शिक्षक भरत्या बंद आहेत. मात्र, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत ८०टक्क्यांपैकी ७० टक्के भरती प्रक्रिया झाली आहे. मी लवकरच शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांना विनंती करणार आहे की, उर्वरित पवित्र पोर्टलची १० टक्के शिक्षक भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी. त्यामुळे गरजूंना नोकऱ्या मिळतील. निवडणूक काळात बेरोजगार शिक्षकांची संस्था चालकांकडून फसवणूक होणार नसल्याचेही ते म्हणाले.

    आप्पांनी साधला ‘तिर- ए -निशाणा’

    निवडणुकीसाठी अनेक संस्था चालक निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत अाहे. निवडणुकीत पैसा वापरण्यासाठी बेरोजगार विद्यार्थी, शिक्षकांकडून पाच – पन्नास लाख रुपये घेवून त्यांनाच निवडणुकीच्या कामात जुंपायचे आणि बोगस अप्रुव्हल देवून त्यांना फसविण्याची दाट शक्यता असल्याने या काळात शिक्षण आयुक्त, शिक्षण अधिकाऱ्यांनी बोगस शिक्षक भरतीवर नजर ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत बोगस अप्रुव्हल देऊ नका. शिक्षण अधिकाऱ्यांनी असा प्रयत्न केल्यास त्यांना मी सोडणार नाही, असा सज्जड दम आमदारांनी प्रसार माध्यमातून दिला. आमदारांच्या रडारवर शिंदे शिक्षण संस्था असली विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात अन्य दोन मातब्बर उमेदवार शिक्षण संस्थेशी संबंधित असल्याने त्यांच्यावरही आ.किशोर पाटील न बोलता ‘तिर- ए -निशाणा’ साधला असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट दिसून आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.