ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

0
8

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील भराडी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोमवारी ट्रॅक्टरवरील अज्ञात चालका विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, चेतन गोकुळ चव्हाण (वय २५, रा. चाळीसगाव) हा त्याचा मित्र किरण राठोड (वय २३, रा.मालखेडा ता. जामनेर) यांच्यासोबत दूचाकीने (क्र.एमएच १९ एए २१४०) जामनेरकडून भराडी फाट्याकडे जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारे ट्रॅक्टरने (एमएच १९ बीजी ९१५०) दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत चेतन चव्हाण आणि किरण राठोड हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर घेऊन पसार झाला होता. दरम्यान जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेतल्यानंतर चेतन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here