Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दोन मोटारसायकल धडकल्या
    क्राईम

    दोन मोटारसायकल धडकल्या

    saimatBy saimatAugust 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोयगाव : प्रतिनिधी

    गावातून येणारी आणि सोयगाववरून वरसाडा तांड्याकडे जाणाऱ्या दोन्ही मोटारसायकलची धडक होवून झालेल्या अपघातात निंबायती येथील चाळीस वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गाला लागून असलेल्या निंबायती फाट्यावर गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. अपघाताची माहिती मिळताच सोयगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेन शेख यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.

    सविस्तर असे की, सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावर लगतच निंबायती फाटा आहे. या फाट्यावरून गावातून निंबायती तांडा येथील प्रकाश उखा चव्हाण (वय ४०) हा मोटारसायकलने (क्र.एमएच-१५ सीपी-३९३२) सोयगावच्या दिशेने येत होता. सोयगावकडून येणाऱ्या मोटारसायकलवरील (क्र.एमएच-१९, डीजी-४२५४) लकी संतोष बडगुजर (वय २२) या दोघांची धडक होवून त्यात प्रकाश चव्हाण हा दूर फेकल्या गेला. तसेच लकी बडगुजर हा किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, या अपघातात प्रकाश चव्हाण याच्या मेंदूला मार बसूून तो गंभीर झाला आहे. त्यास तातडीने सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघात होताच परिसरात ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य केले.

    रस्त्यावर अपघातांची मालिका वाढली

    सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावरील निंबायती फाट्यावर संबंधित विभागाने दिशादर्शक फलक लावलेले नाही. त्यामुळे निंबायती गावातून येणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर अपघातांची मालिका वाढली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला पाचोरात रंगेहात अटक

    February 19, 2026

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.