Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव जिल्ह्यात अवघ्या चोविस तासाच्या अंतरात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात अवघ्या चोविस तासाच्या अंतरात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 14, 2023Updated:September 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव  प्रतिनिधी

    जिल्ह्यात अवघ्या चोवीस तासाच्या अंतरात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.
    पारोळा तालुक्यातील चोरवड येथील हेमराज शेखर पाटील (वय २७) यांच्याकडे सुमारे चार एकर शेती आहे. यंदा शेतीत कापसाची लागवड केली होती. कापसाच्या पिकासाठी त्यांनी पीककर्जही घेतले होते. परंतु नैराश्यातून त्यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या शेतात विषारी औषध प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    दुसरी घटना तालुक्यातील कुऱ्हा-हरोदो येथील शेतकरी शंकर कृष्णा माळी (वय ४२) यांनी कर्जाला कंटाळून आपल्या घरातील छताच्या लाकडी सरईला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकरी शंकर माळी यांनी शेतामध्ये पेरणी केली होती. शंकर माळी यांनी पेरणीसाठी विविध कार्यकारी सोसायटीकडून एक लाख कर्ज आणि काही खासगी बचत गटाच्या कर्ज काढले होते. शेतकरी माळी हे मंगळवारी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले. त्यानंतर दुपारी तीनपर्यंत घरी आले आणि लगेच साडेचारला छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.